सोनल हजारेची मॉडेलिंगमध्ये भरारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोनल हजारे या मराठमोळ्या तरुणीने मॉडेलिंग विश्वात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सोनलने ‘मिस एमिनन्स महाराष्ट्र 2021’चे विजेतेपद पटकावले आहे. ती ‘फेस ऑफ पनाश रनवे 2022’ ची पहिली उपविजेती ठरली आहे. सोनलने ‘ही नशा’ या मराठी संगीत अल्बममध्येही काम केले आहे. ठाणेकर सोनल हजारे वयाच्या 13 व्या वर्षींपासून नृत्य करत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तिने मराठी इंडस्ट्रीतील अनेक नामवंत कलाकारांसोबत काम केले आहे. ‘मिस ठाणे 2021’ स्पर्धेची उपविजेती ठरल्यापासून सोनल मॉडेलिंगमध्ये आत्मविश्वासाने पुढे जात आहे. पनाश रनवे 2021 स्पर्धेची शो स्टॉपरदेखील बनली. ‘मिस क्वीन ऑफ इंडिया 2021’’ स्पर्धेतही तिने यशस्वी कामगिरी केली आहे.