
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना दुसऱयांदा कोरोनाची लागण झाली आहे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी याबाबतची माहिती ट्विट करत दिली आहे. याआधी 2 जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती तेव्हा दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, काँग्रेसचे महासचिव अजय माकन यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी समोर आले आहे.


























































