“अजूनही वेळ गेलेली नाही; इराण आपला जुना मित्र, तर इस्रायल…”, सोनिया गांधी स्पष्टच बोलल्या

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि राज्यसभेच्या खासदार सोनिया गांधी यांनी इराण-इस्रायल युद्धावर हिंदुस्थानने घेतलेल्या भूमिकेवर सडकून टीका करणारा लेख लिहिला आहे. इराण हिंदुस्थानचा जुना मित्र असून अशा परस्थितीत हिंदुस्थानचे मौन अस्वस्थ करणारे असल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

गाझामध्ये होत असलेल्या विध्वंसावर आणि इराणवरील हल्ल्याबाबत हिंदुस्थानने स्पष्ट, जबाबदार आणि मजबूत आवाजात बोलले पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाही, असेही सोनिया गांधी यांनी म्हटले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर या लेखाचे कात्रण शेअर केले आहे.

इराण हा हिंदुस्थानचा जुना मित्र आहे. इराणचे आपल्याशी घनिष्ठ संबंध आहेत. जम्मू-कश्मीरसह महत्त्वाच्या मुद्द्यांवर इराणने हिंदुस्थाना पाठिंबा दिला हा इतिहास आहे. 1994 मध्ये इराणने कश्मीर मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगात हिंदुस्थानवर टीका करणारा ठराव रोखण्यास मदत केली होती, याची आठवण सोनिया गांधी यांनी करून दिली.

हातात तिरंगा, डोळे पाणावलेले; इराणमध्ये अडकलेले 290 विद्यार्थी मायदेशी परतले, कुटुंबियांना पाहून भावूक

हिंदुस्थान आणि इस्रायलमध्ये अलिकडच्या दशकात धोरणात्मक संबंध विकसित केलेले आहेत. अशा परिस्थितीत हिंदुस्थानने आवाज उठवला पाहिजे. जबाबदारीने वागले पाहिजे आणि तणाव कमी करण्यासाठी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी कुटनितीचा वापर केला पाहिजे. सध्याच्या घडीला लाखो हिंदुस्थानी नागरिक आखातामध्ये राहतात आणि काम करतात. त्यामुळे या भागातील शांतता हा राष्ट्रीय हिताचा मुद्दा बनतो, असेही सोनिया गांधी यांनी नमूद केले.

Iran Earthquake- इस्रायलचा हल्ला की इराणची अणुचाचणी? भूकंप नेमका कशामुळे झाला, तर्कवितर्क सुरू