मी माझा मुलगा तुम्हाला सोपवतेय, सोनिया गांधी यांचे रायबरेलीतील जनतेला भावनिक आवाहन

काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून यंदा राहुल गांधी निवडणूक लढत आहेत. राहुल गांधी यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज रायबरेली मतदारसंघात सभा पार पडली. या सभेत जनतेशी संवाद साधताना सोनिया गांधी यांनी जनतेला एक भावनिक आवाहन केलं आहे.

”आमच्या कुटुंबाचे मूळ या मातीशी जुडलेले आहे. गंगा मातेसारखेच निर्मळ असे हे नाते आहे. अवध रायबरेलीच्या शेतकरी आंदोलनापासून हे नाते सुरू झाले. इंदिरा गांधींच्या मनात रायबरेलीसाठी खास जागा होती. मी त्यांना काम करताना खूप जवळून पाहिलेले आहे. इंदिरा गांधी व रायबरेलीच्या लोकांनी मला जे शिकवलं तिच शिकवण मी राहुल व प्रियांकाला दिलेली आहे. सर्वांचा आदर करा, दुबळ्यांचे रक्षण करा. अन्यायाविरोधात लढा द्या. तुमच्या प्रेमामुळे मला कधीच एकटे वाटू दिले नाही. माझ्याकडे जे आहे ते तुमचेचे आहे. आज मी तुम्हाला माझा मुलगा सोपवतेय. जसं तुम्ही मला आपलं मानलं तसंच राहुलला देखील आपलं माना. राहुल तुम्हाला निराश नाही करणार, असे आवाहन सोनिया गांधी यांनी रायबरेलीकरांना केले”