पट्टेदार मित्रांसाठी सुरक्षित निसर्ग, सोनी बीबीसी अर्थ चॅनेलवर खास शो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन नुकताच 29 जुलै रोजी साजरा झाला. या दिनाचे औचित्य साधून सोनी बीबीसी अर्थ चॅनेलने वन्यजीव जागरुकता मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत ‘टायगर स्पाय इन द जंगल’ आणि ‘टायगर्स – हंटिंग द ट्रफिकर्स’ शो दाखवण्यात आले. पट्टेदार मित्रांसाठी सुरक्षित निसर्गाची निर्मिती कशी करावी, याची माहिती देण्यात आली.

व्याघ्रदिनानिमित्त सोनी बीबीसी अर्थवर प्रेक्षकांना साहसी राइडवर नेणारे आणि डोळ्यांत अंजन घालणारे कार्यक्रम सादर करण्यात आले. ‘टायगर स्पाय इन द जंगल’ शोमध्ये खेळकर वाघांच्या पिल्लांपासून किशोरवयीन ते शिकार करणाऱया प्रौढ वाघाचा जीवनप्रवास दाखवला आहे. वाघ प्रौढ झाल्यानंतर जंगलातील इतर प्राण्यांसोबत वाघांचे नाते कसे बदलते याबाबतही माहिती मिळते. वन्यजीवांसमोरची आव्हाने आणि समस्यांवर शोच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आलाय.

शोमध्ये काय

प्रेक्षकांना घनदाट जंगलाची सखोल माहिती देण्यासोबतच वाघांची तस्करी या गंभीर विषयावरची माहिती मिळते. ‘टायगर्स ः हंटिंग द ट्रफिकर्स’ या शोमधून निसर्गातील सर्वात सुंदर प्राण्याचे अस्तित्व कशाप्रकारे धोक्यात आले आहे याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.