आपण एकमेकांवर विश्वास ठेवू, एकमेकांसाठी लढू…, टीम इंडियाच्या पराभवावर कर्णधार शुभमन गिलची प्रतिक्रिया

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत कर्णधार शुभमन गिलची टीम इंडियाला कमतरता जाणवली. मानेला झालेल्या दुखापतीमुळे पहिली कसोटी अर्धी सोडल्यानंतर शुभमन गिल दुसऱ्या कसोटीत मैदानात उतरला नाही. दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 408 धावांनी पराभव केला आणि मालिका 2-0 अशी जिंकली. टीम इंडियाचा हा मालिका पराभव क्रीडा प्रेमींच्या जिव्हारी लागला आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर बरीच टीका सुद्धा होत आहे. अशातच शुभमन गिलने एक सकारात्मक ट्वीट करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगताना दिसत आहे.

शुभमन गिलने बुधवारी ट्वीटरवर एक पोस्ट केली आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, “शांत समुद्र तुम्हाला मार्गक्रमण कसे करायचे हे शिकवत नाही, परंतु वादळे तुम्हाला अधिक मजबूत बनवतात. आपण एकमेकांवर विश्वास ठेवू, एकमेकांसाठी लढू आणि अधिक मजबूत होऊन पुढे जाऊ.” असं गिलने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

शुभमन गिल पहिल्या कसोटीध्ये मैदानात उतरला होता. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला 159 धावांवर बाद केले. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा संघही झटपट 189 धावांवर सर्वबाद झाला. शुभमन गिल फलंदाजीसाठी मैदानात उतरला मात्र, दुखापतीमुळे तीन चेंडूंचा सामना करत चार धावा केल्या आणि तो रिटायर्ड हर्ट झाला. मात्र, त्यानंतर शुभमन गिल दुसऱ्या डावात मैदानात उतरला नाही. तसेच दुसऱ्या कसोटीसाठीही त्याला विश्रांती देण्यात आली होती.

मी कोणालाच या फ्लाइटने प्रवास करण्याचा सल्ला देणार नाही…! मियां भाई Air India वर संतापला