दक्षिण आफ्रिकेच्या अँडरसनकडून फेडररला धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

गतविजेता आणि नंबर वन सिडेड रॉजर फेडररला गुरुवारी विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पराभवाचा ४४० व्होल्टचा झटका बसला. आठव्या सिडेड दक्षिण आफ्रिकेच्या केव्हीन ऍण्डरसनने रॉजर फेडररला चार तास १४ मिनिटांच्या लढतीत पाच सेटमध्ये पराभूत केले आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. स्वित्झर्लंडचा अनुभवी आणि सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या रॉजर फेडररने पहिला सेट ६-२ व दुसरा सेट ७-६ अशा फरकाने जिंकून विजयाच्या दिशेने वाटचाल केली होती. पण त्यानंतर केव्हीन अँडरसनने पुढील तीन सेटमध्ये अफलातून खेळ केला. त्याने ७-५, ६-४, १३-११ अशा फरकाने तीन सेट जिंकून टेनिस विश्वात खळबळ उडवून दिली.

– तीन वेळा चॅम्पियन ठरलेल्या नोवाक जोकोवीचने बुधवारी केई निशीकोरीला चार सेटमध्ये पराभूत करीत यंदा विंबल्डन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पुरुषांच्या एकेरीत सेमी फायनलमध्ये धडक मारली.