वजन वाढविण्यासाठी तीन महिने केक खाल्ला होता, आर.माधवनने सांगितला किस्सा

अभिनेता आर माधवन अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. नुकतेच माधवन याने एका मुलाखतीत एका सिनेमातील किस्सा सांगितला. एका सिनेमासाठी त्याने लवकर वजन वाढवले होते आणि तितक्याच पटकन ते कमीही केले होते.

कर्ली टेल्सशी बोलताना माधवन याने सांगितले की, रॉकेट्री या सिनेमासाठी अप्लाइड काइन्सियोलॉजी मेथडच्या मदतीने वजन वाढवायचे होते. तो म्हणाला, वजन नेमके कसे वाढवायचे आणि पुन्हा ते कसे कमी करायचे यासाठी प्रचंड संशोधन केले. पुढे म्हणाला, संशोधनातून मला अप्लाइड काइन्सियोलॉजी या चाचणीतून आपले आचार विचार भावनिक स्थिती आणि परिस्थितीनुसार आपण कशी प्रतिक्रिया देतो याबाबत या चाचणीतून अनुमान काढले जातात,भावनिक परिस्थितीनुसार आपल्याला एखाद्या पदार्थाचा तिटकारा वाटू शकतो.

माधवन पुढे म्हणाला, तीन महिन्यांपर्यंत फक्त केक खाल्ला, मी फक्त तेवढेच खाल्ले जे माझ्यासाठी योग्य होते. त्यामुळे शरीर फुगले होते. ते एवढे फुगले होते की, खाली वाकून शूजची लेस बांधणेही कठिण होते. पुढे म्हणाला, त्यानंतर मी तेच अन्न खाल्ले जे माझ्या शरीरासाठी योग्य होते. कोणता व्यायाम नाही, धावपळ नाही, शस्त्रक्रिया नाही आणि औषधही नाही. रॉकेट्री या सिनेमामध्ये आर.माधवन याने एयरोस्पेस इंजिनीअर नांबी नारायणन यांची भूमिका साकारले आहे. ज्यावर इस्त्रोमध्ये काम करताना देशद्रोहाचा आरोप लावला जातो.

2022 मध्ये प्रदर्शित झालेला रॉकेट्री हा सिनेमा ऑस्कर 2023 साठी नॉमिनेट झाला होता. आर.माधवन या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत दिसला होता. शिवाय त्याने हा सिनेमाचे दिग्दर्शन केले होते.