
जगातील अनेक राष्ट्रे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी आपल्या सैन्यदलांना सज्ज करत असताना दक्षिण कोरियाला वेगळाच प्रश्न भेडसावत आहे. दक्षिण कोरियाच्या सैन्यात जवानांचा तुटवडा भासतो आहे. मागच्या सहा वर्षांत या देशातील लष्करी जवानांची संख्या 20 टक्क्यांनी घटली आहे. दक्षिण कोरियाचा जगातील सर्वात कमी जन्मदर हे याचे कारण ठरले आहे.
दक्षिण कोरिया हा सर्वाधिक वेगाने म्हातार्या होणाऱ्या देशांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. 2024 मध्ये या देशातील प्रजनन दर 0.75 टक्के होता. हा जगातील सर्वात कमी दर आहे. सैन्याला विशीतल्या तरुणांची सर्वाधिक गरज असते. संरक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार, दक्षिण कोरियातील 20 वर्षांच्या तरुणांची संख्या 2019 ते 2025 या पाच वर्षांत 30 टक्क्यांनी घटून 2,30,000 झाली आहे. त्याचा फटका सैन्य भरतीला बसला आहे.