पारधेवाडीत सोयाबीनची बणीम जळून खाक

829

किल्लारी पासून जवळच असलेल्या पारधे वाडी  येथे सोयाबीनच्या ढिगाऱ्यास आग लागल्याने अंदाजे 50 कट्टे सोयाबीन जळून खाक झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  पारधेवाडी येथील शेतकरी चंद्रकांत रामा भडके हा आपली शेती करून आपली व आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवतो. भडके यांची जमीन गट क्र. 63,48 तसेच अ,ब,क, 65,48 सर्वे नं मध्ये 4 एकर शेती आहे, 4 एकर मधील सर्व सोयाबीन काढुन शेतात ढिग लावले होते. 21 नोव्हेंबर रोजी रात्री 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सोयाबीनच्या ढिगाऱ्यास आग लावल्याने शेतकरी चंद्रकांत भडके यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीत सर्व सोयाबीन जळून खाक झाल्याने शेतकरी भडके यांचा आर्थिक उदरनिर्वाह एकमेव शेतीवर अवलंबून असल्याने भडके यांना मोठ्या अडचणीस सामोरे जावे लागणार आहे. 4 एकर मधील सर्व सोयाबीन जळून खाक झाले असल्यामुळे प्रशासनाकडून काही आर्थिक मदत मिळावी अशी मागणी भडके यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या