
समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांची बुधवारी 2019 च्या द्वेषपूर्ण भाषण प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल त्यांना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये याच प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते.
त्यांना रामपूर कोर्टाने तीन वर्षांचा तुरुंगवास ठोठावला होता ज्यामुळे यूपी विधानसभेतून त्यांना अपात्र ठरवले. याप्रकरणी रामपूर येथील मिलक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कलम 153ए (दोन गटांमधील वैर वाढवणे), 505 (सार्वजनिक गैरव्यवहारास कारणीभूत असलेले विधान) आणि लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 125 अंतर्गत त्यांना दोषी ठरवण्यात आले होते.
त्यानंतर आझम खान यांनी रामपूर न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल केले. या याचिकेवर सुनावणी घेत न्यायालयाने त्यांना त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपातून निर्दोष घोषित केले.
आझम यांच्यावर विविध आरोपांखाली 87 खटले आहेत, जे सर्व 2017 नंतर भाजपने उत्तर प्रदेशात सत्ता हाती घेतल्यानंतर दाखल केले होते.




























































