
तामिळनाडूतील कुन्नूर येथे आज लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. या हेलिकॉप्टरमधून देशाचे चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्यासहीत 14 जण प्रवास करत होते. रावत यांच्यावर वेलिंग्टन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बिपीन रावत यांचा जन्म उत्तराखंडच्या पौडी गावातील एका गढवाली राजपूत कुटुंबात झालेला. 1978 साली त्यांनी गोरखा रायफल्सपासून त्यांच्या करिअरची सुरुवात केली. 2011 मध्ये त्यांनी चौधरी चरण सिंह यूनिवर्सिटी मधून मिलिट्री मीडिया स्टडीज मध्ये पीएचडी केलेली.
– सीडीएस बिपीन रावत यांनी त्यांच्या आयुष्यातील 43 वर्षांचा मोठा काळ हिंदुस्थानी लष्कराची सेवा केली आहे.
– बिपीन रावत हे उंच ठिकाणावर लढाई लढण्यात व काउंटर इंसर्जेंसी ऑपरेशन म्हणजेच प्रत्युत्तरादाखल करण्यात येणाऱ्या कारवाईत एक्सपर्ट मानले जायचे.
– 2016 च्या उरी हल्ल्यानंतर तत्कालिन लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्या नेतृत्त्वात 29 सप्टेंबर 2016 ला लष्कराने पाकिस्तानात घुसून तेथील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते.
– पुलवामा हल्ल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केला होता.
– लष्करातील सेवेदरम्यान त्यांनी एलओसी, चीन सीमा व इशान्य हिंदुस्थानात मोठा काळ घालवलेला आहे.
– बिपीन रावत हे कश्मीर खोऱ्यात पहिल्या नॅशनल रायफल्सचे ब्रिगेडीयर होते. त्यानंतर मेजर जनरल म्हणून त्यांनी इंफ्रेंट्रीची कमान सांभाळली.
– बिपीन रावत यांना इंडियन मिलिटरी अॅकॅडमीतर्फे स्वॉर्ड ऑफ ऑनर देण्यात आलेले आहे.
– रावत हे हिंदुस्थानी लष्कराचे 26 वे लष्कर प्रमुख होते.




























































