
रजोनिवृत्ती हा स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक व संवेदनशील टप्पा असून या काळात शारीरिक, भावनिक व हार्मोनल बदल मोठय़ा प्रमाणावर जाणवतात. हाडांचे विकार, झोपेच्या तक्रारी, हृदयविकाराचा धोका तसेच मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या यांसारख्या बाबींकडे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून विशेष लक्ष देण्यात येत आहे. यासाठी राज्यात शासकीय रुग्णालये व शहरी आरोग्य केंद्रांमध्ये विशेष रजोनिवृत्ती क्लिनिक्स सुरू करण्यात आली आहेत. या उपक्रमाला राज्यभरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली.




























































