कसाबसह सर्व दहशतवाद्यांच्या ओळखपत्रावर हिंदु नावं होती! – उज्ज्वल निकम

1653

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांचे ‘लेट मी सी इट नाऊ’ हे पुस्तक प्रसिद्ध होण्याआधी चर्चेचा विषय बनले आहे. 26/11 हल्ल्याच्या रात्री नेमके काय घडले त्याचा घटनाक्रम पुस्तकात लिहिले आहे. पोलिसांनी कसाबला जिवंत पकडून नायर रुग्णालयात नेले. त्याच्यावरील उपचाराचे सर्व अपडेट आम्ही मिनिटा मिनिटाला घेत होतो असे मारिया यांनी म्हटले आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी कसाबला मारण्याचा कट रचला होता, असेही त्यांनी यात नमूद केले होते. मारिया यांच्या या पुस्तकामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

अजमल कसाबला ‘भारत माता की जय’च्या घोषणा द्यायला लावल्या होत्या- राकेश मारिया

या पुस्तकाबाबत कसाबला फाशीच्या फंदापर्यंत पोहोचवणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (special prosecutor Ujjwal Nikam) यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता ते म्हणाले की, ’26/11 हल्ल्याप्रकरणी आम्ही 10 ओळखपत्र न्यायालयामध्ये सादर केली होती. यातील एक कसाबचे होते, तर इतर मृत्यू पावलेल्या दहशतवाद्यांचे होते. ही सर्व ओळखपत्र खोटी होती आणि त्यावर हिंदू नावे लिहिलेली होती.’

काय आहे पुस्तकात?
कसाबला दाऊदकडून जीवे ठार मारण्याची धमकी आली होती. 26/11 च्या हल्ला लश्कर-ए-तोयबा हिंदू दहशतवादाचे स्वरूप द्यायचे ठरवले होते. त्याच्या मनगटात पवित्र बंधन बांधण्यात आले होते त्याची ओळख समीर चौधरी अशी केली होती. सर्व माध्यमातून तो हिंदू दहशतवादी दर्शवला गेला पाहिजे असा कट लश्करणे रचला होता. कसून केलेल्या चौकशीत कसाब हा पाकिस्तानच्या फरीदकोटचा असल्याचे उघड झाले असे मारिया यांनी नमूद केले आहे. कसाबला जिवंत ठेवणे ही आमच्यासाठी पहिली प्राथमिकता होती. पोलिसांत कसाबा प्रचंड राग होता. आम्ही त्याची दररोज चौकशी करायचो कसाबने अनेक दहशत संबंधित गोपनीय माहिती दिली होती. चौकशीमुळे कसाब सोबत मैत्रीचे संबंध तयार होत होते असा अनुभव मारिया यांनी कथन केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या