
सामना प्रतिनिधी । नांदेड
महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट (एम.एस.आर.टी.सी.)ची अनिश्चित कालीन हडताळ (बंद) सुरू असल्यामुळे प्रवाशांना सोयीचे व्हावे म्हणून नांदेड रेल्वे विभागाने नांदेड ते संभाजीनगर दरम्यान जनसाधारण विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे. ही गाडी उद्या दिनांक १० जून रोजी नांदेड येथून सकाळी ११.२० वाजता सुटेल आणि संभाजीनगर येथे १६.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी संभाजीनगर येथून सायंकाळी १७.१५ वाजता सुटेल आणि नांदेड येथे २२.०० वाजता पोहोचेल.या गाडीला पूर्णा, परभणी, मानवत, सेलू, परतूर, जालना, बदनापूर, मुकुंडवाडी येथे थांबा असेल.
ही गाडी चालवण्याकरिता जालना-नगरसोल-जालना ही डेमु गाडी उद्या दिनांक १० जून २०१८ रोजी रद्द करण्यात आली आहे, असे रेल्वे विभागाने कळवले आहे.



























































