
वसुंधरा दिनाचे औचित्य साधून उन्हाळी सुट्टीत सोनी बीबीसी अर्थ चॅनेलवर विशेष शो सादर होणार आहेत. ‘केअर फॉर अर्थ’, ‘केअर फॉर लाइफ’ अशी ही मोहीम आहे. पर्यावरणाच्या समस्यांबाबत जागरुकता करणे आणि प्रेक्षकांना निसर्गाचे संरक्षण करण्यास प्रेरित करणे हा यामागील उद्देश आहे.
निसर्ग विविध आव्हानांचा सामना करत आहे. या आव्हानांवर प्रकाश टाकणारे शो सादर होणार आहेत. ‘वॉटर ब्रदर्स’ प्रेक्षकांना जलस्रोतांना असलेले धोके दाखवतो. ‘क्लायमेट चेंजः अॅडे ऑन द फ्रण्टलाइन’मध्ये अॅडे अॅडपिटन हवामान बदलावर भाष्य करताना दिसतो. ‘ओशियन रेस्क्यू’ शोमधून मानव आणि समुद्र यांचे नाते उलगडताना महासागरातील प्लॅस्टिक प्रदूषणाच्या विनाशकारी परिणामांवर प्रकाश टाकला जातो. परिवर्तन घडवून आणणाऱया व्यक्तींच्या प्रेरणादायी कथा शोमधून सादर होतात. ‘स्टेसी डूली इन्व्हेस्टिगेट्सः फॅशन्स डर्टी सिव्रेट्स’ फास्ट फॅशन उद्योगाच्या छुप्या खर्चाचा आणि त्याच्या पर्यावरणावर होणाऱया परिणामांना उघड करतो. याशिवाय ‘ट्रिझरर्स डिकोडेड सीरिज 7’ आणि ‘इनसाइड द फॅक्टरी’ हे वेगळे शो पाहता येतील. प्रेक्षकांना 22 एप्रिलपासतून सर्व शो पाहता येतील.


























































