
सामना ऑनलाईन । मुंबई
मध्य रेल्वेने कोकणात गौरीगणपतीसाठी १३२ जादा फेऱ्या सोडल्या असतानाच आता कोकण रेल्वेने पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने मुंबई सेंट्रल व वांद्रे टर्मिनसवरून गणपती विशेष गाडय़ा सोडल्या आहेत. या गाडय़ा मुंबई सेंट्रल-वांद्रे टर्मिनस-अहमदाबाद आणि थिविम-मडगाव जंक्शन-मंगळुरू जंक्शन मार्गावर चालवल्या जाणार आहेत. १२ सप्टेंबरपासून विशेष गाडय़ा सोडण्यात येणार असून त्यामुळे पश्चिम उपनगरात राहणाऱ्या चाकरमान्यांना फायदा होणार आहे.
– गाडी क्र. ०९००१ : मुंबई सेंट्रल-मंगळुरू-मुंबई सेंट्रल (साप्ताहिक) ही गाडी १२ ते १९ सप्टेंबरदरम्यान मुंबई सेंट्रलहून बुधवारी ११.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रा. ७.३० वाजता पोहोचेल.
– गाडी क्र. ०९००२ : ही परतीची गाडी मंगळुरूहून १३ ते २० सप्टेंबर कालावधीत गुरुवारी रा. ११.१० वाजता सुटेल. ही गाडी मुंबई सेंट्रल येथे दुसऱ्या दिवशी रा. ७.३० वाजता पोहोचेल. थांबा : बोरिवली, वसई, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, मडुरे, थिविम, मडगाव ते सूरतकल स्थानकापर्यंत चालवण्यात येईल.
– गाडी क्र. ०९००९ : वांद्रे टर्मिनस-मंगळुरू ही गाडी ११ ते १८ सप्टेंबर कालावधीत वांद्रे टर्मिनसहून मंगळवारी रा.११.५५ वाजता सुटून ही गाडी मंगळुरूस दुसऱया दिवशी रा. ७.३० वा. पोहोचेल.
– गाडी क्र. ०९०१० : ही परतीची गाडी १२ ते १९ सप्टेंबरदरम्यान बुधवारी मंगळुरूहून रा. ११.१० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी वांद्रे टर्मिनसला सायं. ६.४५ वाजता पोहोचेल.
– गाडी क्र. ०९०११ : वांद्रे-मंगळुरू एसी विशेष गाडी १६ ते २३ सप्टेंबरदरम्यान प्रत्येक रविवारी ९, १६, २३ सप्टेंबर रोजी वांद्रे टर्मिनसहून रा. ११.५५ वाजता सुटून दुसऱया दिवशी मंगळुरू येथे रा. ७.३० वाजता पोहोचेल.
– गाडी क्र. ०९०१२ : मंगळुरू-वांद्रे टर्मिनस एसी गाडी १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान दर सोमवारी १०, १७, २४ सप्टेंबर रोजी मंगळुरूहून रा. ११.१० वाजता गाडी सुटून दुसऱ्या दिवशी वांद्रे टर्मिनस येथे सायं. ६.४५ वाजता पोहोचेल.
– गाडी क्र. ०९००७ : मुंबई सेंट्रल-थिविम-मुंबई सेंट्रल विशेष गाडी आठवडय़ातून तीनवेळा चालवली जाईल. मुंबई सेंट्रलहून ही गाडी ६, ८, १०, १३, १५, १७, २०, २२ सप्टेंबर रोजी रा. ११.५० वाजता सुटून दुसऱया दिवशी थिविम येथे दु. ४ वाजता पोहोचेल.
– गाडी क्र. ०९००८ : ही परतीची गाडी थिविमहून ७, ९, ११, १४, १६, १८, २१, २३ सप्टेंबर रोजी दु. ४.३० वाजता सुटून मुंबई सेंट्रल येथे सकाळी ९.०५ वा. पोहोचेल. थांबा : बोरिवली, वसई, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, मडुरे.


























































