होळीनिमित्त रेल्वेतर्फे विशेष गाड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

होळी सण साजरा करण्यासाठी उत्तर हिंदुस्थानात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी विचारात घेता रेल्वे प्रशासनाने मुंबई ते जयनगर मार्गावर चार विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 25 मार्च व 1 एप्रिल रात्री 00.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 15 वाजता जयनगर येथे पोहोचणार आहेत. या विशेष गाड्यांना कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, पाटणा, बरौनी, समस्तीपूर आणि दरभंगा या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे, अशीही माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

विशेष गाड्यांचा तपशील

ट्रेन क्र. 05562 होळी विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 25 मार्च 2022 आणि 1 एप्रिल 2022 रोजी 00.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 15.00 वाजता जयनगरला पोहोचेल.

ट्रेन क्र.05561 होळी विशेष जयनगर येथून 22 मार्च 2022 आणि 29 मार्च 2022 रोजी 23.50 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 13.00 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

आरक्षण –

विशेष ट्रेन क्रमांक 05562 चे बुकिंग दि. १५.३.२०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.