
स्पाईस जेट कंपनीचे विमान वादळात सापडून झालेल्या अपघातात 40 प्रवासी जखमी झाले. पश्चिम बंगालच्या दुर्गापूर जिह्यातील काझी नझरूल इस्लाम विमानतळावर उतरत असताना विमान वादळात सापडले आणि विमानाला मोठा झटका बसला. या झटक्याने विमानातील सामान प्रवाशांच्या डोक्यावर पडले. त्यात 40 प्रवासी जखमी झाले. यातील 10 प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर प्रवाशांच्या जिवाला धोका नाही, असे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे. अत्यंत वाईट हवामान असल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


























































