मसाले भात

4710

>>शेफ विष्णू मनोहर  

साहित्य – 3 वाटय़ा तांदूळ , 1 वाटी सोललेला बटाटा, 1 वाटी फ्लॉवरचे तुकडे, अर्धा चमचा शहाजिरे, 1-1 चमचा आलं-लसूण, अर्धी वाटी दही 1-1 चमचा धणे-जिरे पावडर, अर्धा चमचा हळद, तिखट चवीनुसार, 1 चमचा खडा मसाला, पाव वाटी कोथिंबीर, मीठ चवीनुसार, 1 चमचा काळा मसाला, 2 चमचे साजूक तूप, 4 चमचे ओलं खोबरं.

कृती – सर्व प्रथम एक वाटी सोललेला बटाटा, एक वाटी फ्लॉवर तेलात तळून घ्या. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यामध्ये शहाजिरे, आलं, लसूण, दही, धणे-जिरे पावडर, हळद, तिखट, थोडा खडा मसाला, बारीक चिरलेला कोथिंबीर व तळलेले बटाटे, फ्लॉवर टाका. दुसऱया एका पातेल्यात पाणी गरम करून त्यामध्ये थोडं मीठ व धुतलेला तांदूळ शिजत ठेवा. त्याचबरोबर फ्लॉवर, बटाटय़ाचा मसाला व काळा मसाला पण घाला. त्यावर 2 चमचे साजूक तूप घालून मंद आचेवर भात शिजवा. वरून ओलं खोबरं, कोथिंबीर घालून खायला द्या.

आपली प्रतिक्रिया द्या