एशियाडसाठी हिंदुस्थानी कबड्डी संघाची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पुणे

दुबई मास्टर कबड्डी स्पर्धा गाजवणारे महाराष्ट्राचे गिरीश इरनाक व रिशांक देकाडिगा या दोन शिलेदारांची १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पुन्हा एकदा हिंदुस्थानच्या कबड्डी संघात निवड करण्यात आली आहे. तर पुण्याची सायली केरीपाळे हिची महिला संघात निवड जाहीर झाली आहे. रेल्केकडून खेळणारी महाराष्ट्राची सोनाली शिंगटे हिचादेखील महिला संघात समावेश झाला आहे.  हिंदुस्थानच्या पुरुष व महिला संघांची रविवारी घोषणा करण्यात आली.

जकार्ता (इंडोनेशिया) येथे १८  ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत या आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. यात कबड्डी स्पर्धा १९ ते २५ ऑगस्ट या कालावधीत होणार आहेत. दुबई येथील स्पर्धेत खेळलेले सुरजित, सुरिंदर नाडा, मनजीत चिल्लर यांना वगळण्यात आले असून तेलंगणाचा मल्लेश गंगाधर याची पुरुष संघात वर्णी लागली आहे.

अपेक्षेप्रमाणे पहिला सुपर टेन करणारा रिशांक व दोन केळा हाय-फाय करणारा गिरीश या दोन महाराष्ट्राच्या शिलेदारांनी हिंदुस्थानी संघात पुन्हा एकदा स्थान मिळविले आहे. दुबईत पाकिस्तानबरोबर झालेल्या पहिल्या सामन्यात या दोघांना संधी मिळाली नक्हती, पण त्यानंतर मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करीत या दोघांनी आपली निवड सार्थ ठरवली. यापुढील सर्वच सामन्यात त्यांनी आपल्या जोशपूर्ण खेळाने हिंदुस्थान निवड समितीला त्यांच्या नावाचा विचार करण्यास भाग पाडले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पाटील, कार्याध्यक्ष दत्ताभाऊ पाथ्रीकर, सचिक आस्वाद पाटील व सर पदाधिकार्‍यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

हिंदुस्थानी कबड्डी संघ  खालीलप्रमाणे :

पुरुष संघ : गिरीश इरनाक (महाराष्ट्र), दीपक हुडा (राजस्थान), मोहित चिल्लर (हिंदुस्थानी रेल्के), संदीप नरकाल (हरयाणा), प्रदीप नरकाल (उत्तराखंड), रिशांक देकाडिगा (महाराष्ट्र), मोनू गोयत (सेनादल), अजय ठाकूर (हिमाचल प्रदेश), रोहित कुमार (सेनादल), राजूलाल चौधरी (राजस्थान), मल्लेश गंगाधर (तेलंगणा), राहुल चौधरी (उत्तर प्रदेश).

राखीव : अमित नांगर (दिल्ली), मनिंदरसिंग (पंजाब).

 

महिला संघ : साक्षीकुमारी (हरयाणा), ककिता, प्रियांका (दोघी हिमाचल प्रदेश), मनजीत कौर (राजस्थान), पायल चौधरी, रितू नेगी, सोनाली शिंगटे (तिघी हिंदुस्थानी रेल्के), सायली केरीपाळे (महाराष्ट्र), रणदीप कौर खेरा (पंजाब), शालिनी पाठक (राजस्थान), उषाराणी नरसिंह (कर्नाटक), मधू (दिल्ली).

राखीव : प्रियांका (हरयाणा), शमा परकीन (बिहार).