चुकीला माफी नाही; हायकोर्टाचा याचिकाकर्त्यांना 30 लाखांचा दंड

तांत्रिक मुद्दय़ांवर फेटाळून लावलेल्या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी याचिकाकर्त्यांना 30 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. तशी ताकीदच उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिली आहे. महात्मा फुले गृहनिर्माण सोसायटीच्या एसआरए प्रकल्पाबाबत 2019 मध्ये दोन याचिका दाखल झाल्या. ऑफिस ऑब्जेक्शन न काढल्याने तांत्रिक मुद्दय़ांवर न्यायालयाने या याचिका फेटाळल्या. तांत्रिक मुद्दय़ांचे निरसन केले जाईल. या याचिकांवर नव्याने सुनावणी घ्यावी. हा अर्ज करण्यास 1959 दिवसांचा झालेला उशीर माफ करावा, अशी विनंती या याचिकाकर्त्यांनी केली.