श्रीलंकेत बुरखाबंदी

720

श्रीलंकेत बुरखाबंदी करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड होणार नसल्याचे स्पष्ट करत संसदीय समितीने बुरखाबंदीचा प्रस्ताव दिला असून त्याची तत्काळ अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच वंशाच्या आणि धर्माच्या नावाने राजकारण करणाऱया राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करावी असेही म्हटले आहे. गेल्या ईस्टर संडेच्या दिवशी 21 एप्रिल 2019 रोजी दहशतवाद्यांनी चर्चसह अन्य ठिकाणी केलेल्या हल्ल्यात 258 नागरिकांचे बळी गेले होते. त्याची गंभीर दखल घेत सरकारने दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी कठोर धोरण अवलंबले आहे. राष्ट्रीय सुरक्षेबाबत विभागीय निरीक्षण समितीचे अध्यक्ष खासदार माल्लीथा जयातिलाका यांनी आपला अहवाल दिला आहे. जगामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अनेक देशांमध्ये बुरखाबंदी लागू केली असल्याचे त्यांनी अहवालात म्हटले आहे. त्यानुसार संसदीय समितीने बुरखाबंदीचा प्रस्ताव दिला आहे. तसेच कोणी बुरखा काढण्यास नकार दिल्यास पोलीस वॉरंटशिवाय संबंधिताला अटक करू शकणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या