सीबीआयचे डोके श्री श्री रविशंकर ठिकाणावर आणणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मुंबई

देशातील केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयमध्ये वरिष्ठांमधील वाद, वरिष्ठांवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे ही यंत्रणा बदनाम होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी सीबीआय म्हटले की काळा पैसा, साठेबाज आणि गुन्हेगारांना घाम फुटायचा पण आता सीबीआयमध्येच ‘फाटाफूट’ झाली आहे. या सगळय़ा पार्श्वभूमीवर सीबीआयचे डोके ठिकाणावर आणायला आता आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी पुढाकार घेतला असून सीबीआय कर्मचाऱ्यांना ते ध्यानधारण शिकवणार आहेत. रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे मार्गदर्शक नवी दिल्लीतील सीबीआयच्या मुख्यालयात जवळजवळ 150 वरिष्ठ अधिकाऱ्यांना तीन दिवस ध्यानधारणेचे धडे देणार आहेत.