
अकरावी ऑनलाईन प्रवेशाची विभागनिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर झाली. या यादीनुसार मुंबई विभागातील 99 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल सायन्स शाखेकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वसाधारण गुणवत्ता यादी विषयी काही तक्रारी असल्यास असे विद्यार्थी 24 ऑगस्ट, सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्वतःच्या लॉगीनद्वारे संपर्क साधू शकतात. त्यानंतर 27 आँगस्टला सकाळी 10 वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 100 टक्के गुण मिळवलेल्या पहिल्या 30 विद्यार्थ्यांपैकी 25 विद्यार्थ्यांनी सायन्स शाखेतील प्रवेशासाठी अर्ज केला आहे. त्यानंतर 99 टक्क्याहून आधिक गुण असलेल्या 70 विद्यार्थ्यांमध्ये 22 जणांनी कॉमर्स शाखेला पसंती दर्शवली आहे. तर 7 जणांनी कला शाखेकडे आपला कल दाखवला आहे.
शाखा निहाय उपलब्ध जागा
कला 37700
वाणिज्य 174580
विज्ञान 102770
एचएसव्हीसी 5660
एकूण 320710
पहिल्या यादीसाठी अर्ज केलेले
कला 17,254
वाणिज्य 1,13,610
विज्ञान 70,254
एचएसव्हीसी 913
4 हजार 353 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
सध्या सुरू असलेल्या कोटा प्रवेश प्रक्रियेत इन हाउस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन कोटा प्रवेश प्रक्रियेत 4353 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
अकरावी प्रवेशासाठी मुंबई विभागातील तब्बल 3 लाख 20 हजार 710 जागांसाठी शेवटच्या दिवसांपार्यंत 2 लाख 37 हजार 383 विद्यार्थ्यांनीच नोंदणी केली आहे. यातील अवघ्या दोन लाख 2 हजार 58 विद्यार्थ्यांनी कॉलेज निवडीचा पर्याय भरलेला आहे. यामुळे यंदा तब्बल 1 लाखांपेक्षा जास्त जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
































































