
नांदेड मालेगाव रस्त्यावर अज्ञातांनी बस पेटवून दिली.ही घटना मंगळवारी रात्री नांदेड मालेगांव रस्त्यावरील कासारखेडा येथे घडली. वसमत ते नांदेड जाणारी बस क्रमांक एम.एच.20 बी.एल. 1146 ही बस रात्री आठ वाजताच्या सुमारास वसमत ते नांदेड मार्गे जात होती. अर्धापूर हद्दीतील मालेगाव ते कासरखेडा रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या पुलाजवळ अज्ञातांनी सदर बसवर दगडफेक केली. प्रवाशी बाहेर पडल्यानंतर ही बस पेटवून दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मस्के,कपिल बुद्धेवाड, बळीराम राठोड, जमादार पपू चव्हाण,तुकाराम बोइनवाड महेंद्र डांगे आदी पोलिसांचे पथक व अग्नीशामक गाडी दाखल झाले होते. बसमध्ये तीस ते चाळीस प्रवासी होतो. आरक्षणासाठी आक्रमक झालेल्यांनी ही बस पेटवली असावी असा अंदाज आहे.



























































