तुरुंगातून सुटताच करू लागला चोऱ्या

लोखंडचोरीसाठी रस्त्यावर पार्क केलेल्या मोटारसायकली चोरणाऱया सराईत चोरटय़ाला पवई पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. विशाल कोळे असे त्याचे नाव आहे. त्याच्या अटकेने 12 गुह्यांची उकल करण्यात पवई पोलिसांना यश आले आहे.

पवई येथे राहणारे शेख यांची गेल्या महिन्यात मोटारसायकल चोरी झाली होती. मोटारसायकल चोरीप्रकरणी पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्ता विरोधात गुन्हा नोंद केला होता. वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक गणेश पाटील, सहाय्यक निरीक्षक संतोष कांबळे, टिळेकर, येडगे, झेंडे, सुरवाडे, शेट्टी, ठाकरे आदींच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये पोलिसांना विशाल दिसला. पोलिसांनी चेंबूर येथे सापळा रचून विशालला ताब्यात घेतले.