स्टेट बँकेच्या व्याजदरात कपात

16

सामना प्रतिनिधी । मुंबई

रिझर्व्ह बँकेने रेपो दर कमी केल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कर्जाच्या व्याजदरामध्ये 0.05 टक्क्यांची कपात केली. नवीन व्याजदर बुधवारपासून लागू होणार आहेत. रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात रेपो दर 6 टक्क्यांवरून 5.75 टक्क्यांवर आणला. त्यानुसार स्टेट बँकेने सर्व मुदतीच्या कर्जांच्या व्याजदरात कपात केली आहे. एका वर्षाच्या कर्जाचा किमान व्याजदर 8.40 टक्के झाला आहे. एमसीएलआरशी संबंधित सर्व कर्जांचा व्याजदर 0.05 टक्क्यांनी कमी होणार आहे. चालू आर्थिक वर्षातील ही तिसरी व्याजकपात आहे. परिणामी, 10 एप्रिलपासून गृहकर्जाचे व्याज 0.20 टक्क्यांनी कमी झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या