
मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर, शीव रुग्णालयांना लवकरच अत्याधुनिक एमआरआय यंत्रणा मिळणार आहे. केंद्र सरकाच्या एम्सकडून एमआरआय यंत्र खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून लवकरच ही उपकरणे उपलब्ध होणार आहेत.
मुंबई पालिकेच्या केईएम, शीव, नायर, कूपर या प्रमुख रुग्णालयांमध्ये दरदिवशी हजारो रुग्ण येत असतात. मात्र, जुनी एमआरआय उपकरणे कायमर्यादा संपल्यामुळे बंद पडली आहेत. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया राबवली. मात्र, या निविदांमध्ये एक एमआरआय उपकरण हे 36 कोटीला देण्याचे कंत्राटदाराने म्हटले होते. मात्र, हेच एक उपकरण केंद्र सरकारच्या एम्सकडून केवळ 26 कोटीत मिळत असल्याची माहिती मिळल्यानंतर महापालिकेने जुनी निविदा प्रक्रिया रद्द करून त्या एम्सकडून ही उपकरणे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच पेंद्र सरकारच्या एम्स रुग्णालयांमध्ये वापरण्यात येत असलेली अद्ययावत एमआरआय उपकरणे पालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार आहेत.
जिवावर बेतणारे धाडस नको
शिवडी रेल्वे स्थानकाजवळ पादचाऱयांना येण्या-जाण्यासाठी ट्रकच्या काही अंतरावरच खबरदारीसाठी थांबा असा लोखंडी फलक आहे. रूळ ओलांडताना अपघात होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने सिग्नलचीही व्यवस्था केली आहे. मात्र तरीही काही जण जिवावर बेतणारे धाडस करतात. एका सायकलस्वाराने अशा प्रकारे रुळांवरून सायकल काढून जीव धोक्यात घातला तेव्हा बघणाऱयांची गाळण उडाली.


























































