आरटीओ कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता करून घेण्यासाठी आरटीओ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप कायम ठेवला आहे. मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे.

आकृतीबंध मंजूर होऊन साडेतीन वर्षे झाली तरी सेवाप्रवेश नियम तयार नाहीत. कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवले जात असून त्यांचे आर्थिक व सामाजिक नुकसान होत आहे. परिणामी, आरटीओ कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. सोमवारपासून आंदोलनाची धार तीव्र केली जाईल, असे संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी जाहीर केले.