नाशिक बस अपघातानंतर आरटीओची राज्यभरात वाहन तपासणी मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिकमध्ये खासगी बसला झालेल्या अपघातात 11 जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर परिवहन विभाग राज्यभरात मोहीम राबवून खासगी बसेसची झाडाझडती होणार आहे. 9 ते 23 ऑक्टोबर दरम्यान ही मोहीम राज्यभरातील आरटीओ कर्मचारी राबवणार आहेत.

नाशिक येथे यवतमाळ ते मुंबई असा प्रवास करणाऱया खासगी स्लिपर कोच बसला अपघात होऊन ही बस पेटल्याने 11 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला होता. त्यामुळे खासगी बसेसची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

बेकायदा खासगी बसेसची झाडाझडती

विना परवाना अथवा परवान्याच्या अटीचा भंग करून वाहन चालविणे, प्रवासी बसमधून अवैधरित्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र, रिफ्लेक्टर,इंडिकेटर, टेल लाईट, वायपर, इ. बाबींची तपासणी, वाहनात केलेले फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक, मोटार वाहन कर भरल्याची तपासणी करणे, जादा भाडे आकारणी, अग्निशमन यंत्रणा तसेच आपात्कालिन दरवाजांची तपासणी आदी तपासण्या करण्यात येत आहेत.