
हिंदुस्थानी शेअर बाजारात गुरुवारी पडझड पाहायला मिळाली. सेन्सेक्स 148 अंकांनी घसरून 83,311 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत 88 अंकांनी घसरून 25,510 अंकांवर स्थिरावला. विदेशी गुंतवणुकदारांनी गुरुवारीही नफावसुली केल्याने शेअर बाजार कोसळला. बँकिंग, वित्तीय सेवा आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी विक्री झाल्याने बाजारात घसरण झाली. सेन्सेक्समधील कंपन्या पॉवरग्रीड, इटरनल, बीईएल, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, टायटन, एनटीपीसी, टाटा स्टील, भारती एअरटेल, कोटक बँक, एलअँडटी, बजाज फिनसर्वच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तर एशियन पेंट्स, महिंद्रा अँड महिंद्रा, टीसीएस, मारुती सुझुकी, टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली. आदित्य बिर्ला ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली, ग्रासिम आणि हिंदाल्कोचे शेअर्सही घसरले.



























































