
भगवान शिवाचे शहर अशी ओळख असणाऱ्या वाराणसीतून शतकांपूर्वी अन्नपूर्णा देवीची पाषाणची प्राचीन मूर्ती चोरीला गेली होती. ती मूर्ती सध्या कॅनडातील रेजिना विद्यापीठाच्या संग्रहालयात आहे. कॅनडातून ती मूर्ती परत मिळवण्यात हिंदुस्थानला यश आले आहे. नुकत्याच व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे झालेल्या सोहळ्यात ही मूर्ती प्रतिकात्मक स्वरुपात मूर्ती हिंदुस्थानकडे सूपूर्द करण्यात आली आहे.
19 ते 25 नोव्हेंबरदरम्यान जागतिक वारसा सप्ताह सुरू असतानाच कॅनडातून ही मूर्ती हिंदुस्थानला परत मिळाली आहे. व्हीडिओ कटन्फरन्सिंगद्वारे मॅकेन्झी आर्ट गॅलरी येथील विद्यापीठाच्या रेजिनाच्या संग्रहातील पुतळा हिंदुस्थानकडे सूपूर्द करण्यात आला. आता ही मूर्ती लवकरच हिंदुस्थानात पाठवण्यात येणार आहे. विद्यापीठाचे अध्यक्ष आणि कुलगुरू डॉ. थॉमस चेसस हिंदुस्थानी उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्यासह मॅकेन्झी आर्ट गॅलरी, ग्लोबल अफेयर्स कॅनडा आणि कॅनडा बॉर्डर सर्व्हिसेस एजन्सीचे प्रतिनिधीही या सोहळ्याला उपस्थित होते.
अन्नपूर्णा देवीची ही दूर्मिळ पाषाणाची मूर्ती असून शतकापूर्वी ती वारणसीतून चोरीला गेली होती. त्यानंतर अवैध मार्गाने ती कॅनडात पोहचली होती. त्यानंतर तेथील रेजिना विद्यापीठातील संग्रहालयात ती ठेवण्यात आली होती. हिंदुस्थानातून चोरीला गेलेल्या आणि इतर देशात आढळलेल्या काही मूर्ती परत आणण्यात यश आले आहे.


























































