
गोहत्या रोखल्यास जगभरातील सर्व समस्या आपोआप सुटतील, असे मत गुजरातमधील तापी जिल्हा न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी व्यक्त केले आहे. तसेच घर बनवताना गाईच्या शेणाचा वापर केल्यास अणुउत्सर्जनाचा परिणाम होत नाही असे मतही त्यांनी व्यक्त केले.
एका न्यूज वेब पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये गोहत्या रोखण्याबाबत दिलेल्या निर्देशांचे पालन झाले नसल्याचे सांगत न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत गोहत्या थांबत नाहीत तोपर्यंत आपल्याला सर्व सहन करावे लागणार असल्याचे न्यायमूर्ती म्हणाले.


























































