वादळी वाऱ्यासह पावसाने कोल्हापूरला झोडपले; पिकांचे नुकसान

717

वादळीवाऱ्यासह बरसलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा झोडपले. वाढत्या उकाड्याने हैराण झालेल्यांना नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी पावसामुळे कलिंगड,काजू,आंबा आदी पिकांचे नुकसान झाले आहे.

आठवड्याभरात पुन्हा आलेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळले. घरावरचे पत्रे उडाले. शिये,ता.करवीर येथील एका शाळेचे पत्रेॉउडाले. तर परिसरातील एका पेट्रोलपंपाचे शेड आणि पेट्रोल पंप कोसळून दुचाकींचेही नुकसान झाले. लॉकडाउन तसेच संचारबंदीमुळे पावसाळ्यापूर्वीची दुरुस्तीची कामे करुन घेता न आल्याने हा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात उष्णतेची लाट असल्याने सर्वजण उकाड्याने हैराण झाले असतानाच दुपारनंतर काही काळ ढगाळ वातावरण तयार झाले. वादळी वारे सुटल्यानंतर सायंकाळी पावसाने सुरुवात केली. काही ठिकाणी गारपीटही झाली. पावसामुळे विद्युत खांब कोसळल्याने अनेक भागांत रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या