आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याला अटक

29

सामना ऑनलाईन। अमृतसर

पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला देशाच्या सुरेक्षिततेशी संबंधित गोपनीय माहिती पुरवणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याला पंजाब पोलिसांनी अटारी स्थानकावरून अटक केली आहे. रमकेश मीना असे त्याचे नाव असून त्याच्याजवळून काही व्हिडीओ व टेप जप्त करण्यात आल्या आहेत.

रमकेश रेल्वेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्यावर नजर ठेऊन होते. तो मूळचा राजस्थानमधील दौसा जिल्हयाचा रहीवासी आहे. पण कामानिमित्त पंजाबमध्ये राहत आहे. काही दिवसांपूर्वी तो कटारी रेल्वे स्थानकाचा व्हिडीओ आणि फोटो काढत होता. तसेच समझौता एक्सप्रेसबद्दल माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात होता. तसेच बीएसएफच्या काही तळांचीही तो माहिती काढत असल्याचे पोलिसांना कळाले होते.

त्याने यातील काही व्हिडीओ आणि गोपनीय माहिती पाकिस्तानमध्येही पाठवल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्याच्याजवळून बीएसएफच्या दोन अधिकाऱ्यांचे फोटोही जप्त करण्यात आले आहेत. याबद्दल पोलिसांना कळताच सायबर पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला बेड्या ठोकल्या.

आपली प्रतिक्रिया द्या