पश्चिम बंगालची निवडणूक म्हणजे देशातील लोकशाहीसाठीची लढाई – प्रशांत किशोर

prashant-kishore

पश्चिम बंगालची निवडणूक ही देशासाठी महत्त्वाची असल्याचे रणनितीकार प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. तसेच ही निवडणूक देशातील लोकशाहीसाठी लढा असल्याचेही किशोर यांनी म्हटले आहे.

शुक्रवारी पश्चिम बंगालसह केरळ, आसाम आणि तमिळनाडूच्या निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभुमीवर रणनितीकार प्रशांत किशोर यांनी ट्विट केले आहे.

किशोर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की पश्चिम बंगालची ही निवडणूक म्हणजे देशातील लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. पश्चिम बंगालची जनता त्यांचे उत्तर देण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच बंगालला त्यांची स्वतःची कन्या हवी आहे दोन मे रोजी माझे हे ट्विट पुन्हा पाहा असेही किशोर यांनी नमूद केले आहे.

भाजपला पश्चिम बंगालमध्ये दोन आकडी जागा मिळवणेही कठीण असल्याचे किशोर यांनी म्हटले होते. तसेच माझा हा दावा खोटा ठरल्यास माझा व्यवसाय सोडून देईन असेही किशोर यांनी डिसेंबर मध्ये म्हटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या