आंतरराष्ट्रीय रेबीज दिनी भटक्या प्राण्यांना प्रतिबंधक लस, मुंबई व्हेटर्नरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

मुंबईत भटके कुत्रे आणि मांजरांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. या प्राण्यांच्या दंशामुळे रस्त्यावरून जाणाऱया पादचारी आणि नागरिकांना या प्राण्यांकडून हल्ले होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे माणसांना रेबीजसारख्या प्राणघातक आजाराला बळी पडावे लागत आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी मुंबईतील गोरेगाव व परळच्या मुंबई व्हेटर्नरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी आंतरराष्ट्रीय रेबीज दिनाच्या निमित्ताने मुंबई ते ठाण्यात भटके कुत्रे आणि मांजरांना रेबीज प्रतिबंधक लस टोचण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला. या उपक्रमाला नेचर्स अॅली फाउंडेशन (एनएएफ) या सेवाभावी संस्थेचे सहकार्य लाभले होते.

मुंबई व्हेटर्नरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या मोहिमेत रस्त्यावर आणि गल्ल्यांत भटकणाऱया सुमारे 1000 कुत्रे व मांजरांना रेबीज प्रतिबंधक लसीची इंजेक्शन दिली. हि मोहीम कोरोना प्रतिबंधाचे सर्व उपाय अमलात आणून यशस्वी करण्यात आली. नेचर्स अॅलीचे संस्थापक सगूण भटजीवाले जे स्वतः पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत त्यांच्या सहकार्याने आयोजिलेल्या या रेबीज लसीकरण उपक्रमात मुबईतील 20 पशुवैद्यक तज्ञ आणि 60 पशुवैद्यकीय प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. संपूर्ण मुंबई ते ठाणे दरम्यान गटागटाने मुंबई व्हेटर्नरी कॉलेजचे विद्यार्थी या  रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीमेत सहभागी झाले होते. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आपली प्रतिक्रिया द्या