बेकायदेशीर बांगलादेशींविरुद्ध कठोर कारवाई, 401 गुन्हे दाखल, एक हजार एक जण हद्दपार

हिंदुस्थानात घुसखोरी करून मुंबईत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी चालू वर्षात आतापर्यंत बांगलादेशींविरोधात 401 गुन्हे दाखल केले असून तब्बल एक हजार एक जणांना त्यांच्या देशात हाकलून लावले आहे.

मुंबईत येऊन बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या घुसखोर बांगलादेशींविरोधात मुंबई पोलिसांनी दंड थोपाटले आहेत. जानेवारी 2025 पासून आजपर्यंत पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी केलेल्या कारवाईत एक हजार एक बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या देशात हद्दपार करण्यात आले आहे. तसेच जवळपास 401 फौजदारी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ही कारवाई यापुढेदेखील अशीच सुरू राहणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.