दुचाकीला टक्कर देणारी इलेक्ट्रीक सायकल लॉन्च, अवघ्या 30 पैशात धावणार पाच किलोमीटर

कामासाठी किंवा व्यवसायासाठी तुम्ही 20 ते 25 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी दुचाकी वापरत असाल. परंतु आता हा प्रवास तुम्ही सायकलवरही आरामात पार करू शकता. कारण टाटा इंटरनॅशनल लिमिटेडची मालकी असणाऱ्या स्ट्रायकरने दोन दमदार इलेक्ट्रीक सायकल लॉन्च केल्या आहेत. या सायकलचे वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या तीस पैशांमध्ये तुम्ही पाच किलोमीटर प्रवास करू शकता.

voltic-1-7new

स्कायटरने Contino ETB 100 आणि Voltic 1.7 नावाने दोन इलेक्ट्रीक सायकल हिंदुस्थानच्या बाजारात लॉन्च केल्या आहेत. यातील Contino ETB 100 ही इलेक्ट्रीक सायकल विशेषत: शहरातील तरुणांवर फोकस करून बनवण्यात आली आहे.

contino

Contino ETB 100 ही इलेक्ट्रीय सायकल एकदा चार्ज केल्यानंतर 60 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकते. स्मार्ट सेफ्टी फिचर्ससह यात सात स्पीड आणि तीन राईड मोड देण्यात आले आहे. याची किंमत 37 हजार 999 रुपये असून ब्लॅक आणि ब्लू रंगात ही ई-सायकल उपलब्ध आहे.

contino1

तर Voltic 1.7 याची सुरुवातीची किंमत 29 हजार 995 रुपये ठेवली आहे. ग्रे आणि रेड कलरमध्ये या सायकल विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यात शक्तीशाली मोटार आणि लिथियम आयन बॅटरी बसवण्यात आली आहे. या इलेक्ट्रीक सायकलची बॅटरी फूल चार्ज होण्यासाठी तीन तास लागतात. एकदा चार्ज केल्यानंतर ही सायकल 25 ते 28 किलोमीटर प्रवास करू शकते. याचा सर्वोच्च वेग 25 किलोमीटर प्रति तास एवढा आहे. विशेष म्हणजे कंपनी या सायकलवर दोन वर्षांची वॉरंटीही देत आहे.

voltic-1-7

आपली प्रतिक्रिया द्या