सीएच्या परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। बीड

चार्टड अकाऊंटंट परीक्षेत नापास झाल्याने एका चोवीस वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी तालुक्यातील सफेपूर येथे घडली आहे. रामचंद्र घोडके असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो शिक्षणासाठी संभाजीनगरला राहत होता.

त्याने नुकतीच चार्टड अकाऊंटंटच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिली होती. शुक्रवारी परीक्षेचा निकाल घोषित झाला. पण उत्तीर्ण होण्यासाठी ज्ञानेश्वरला ११ गुण कमी मिळाले. यामुळे तो निराश झाला होता. शनिवारी सकाळी आठ वाजता तो घराबाहेर पडला. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता त्याचा मृतदेह शेतातील आंब्याच्या झाडास गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळला. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. ज्ञानेश्वर हा खूप हुशार आणि अत्यंत अभ्यासू मुलगा होता. सर्वांच्या परिचयाचा होता. त्याच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी नेकनूर पोलिसांत आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.