केबीके शाळा संचालकाला अटक

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील बल्याणी येथे केबीके शाळेची संरक्षक भिंत चाळीवर कोसळून अंशुकुमार सिंग या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी शाळा संचालक सुबराव खराडे याला बेडय़ा ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शाळेची भिंत धोकादायक असून तिची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा शाळेकडे केली होती.