
ग्लोबल वॉर्मिंगचे संकट मोठे आहे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेतच वसुंधरेच्या रक्षणासाठीचे गांभीर्य लक्षात घ्यावे. पर्यावरण संवर्धन जनजागृती करण्यापूर्वी सुरुवात ,स्वत:पासून करावी. पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा ठरेल, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी करून विद्यार्थ्यांना ‘समृद्ध पर्यावरण रक्षण संकल्प’ शपथ दिली.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण संवर्धन जनजागृती करण्यापूर्वी सुरुवात स्वत:पासून करावी. प्रत्येक वाढदिवसाला एक तरी झाड लावावे आणि त्या झाडाची निगा राखावी. राज्याची प्रगती करण्यासाठी पर्यावरण संकल्पाची शपथ घेऊन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. स्वच्छता राखणे, प्लॅस्टिक न वापरणे असा संकल्प करावा असे सांगून आपण प्रामाणिकपणे वसुंधरेच्या रक्षणाची कर्तव्ये पार पाडावीत, असे आवाहन केले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री संजय बनसोडे, अदिती तटकरे, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तक, सदस्य सचिव ई. रविंद्रन आदी मान्यवर उपस्थित होते.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना समृद्ध पर्यावरण रक्षणाची शपथ दिली. पर्यावरण संवर्धनाची सुरुवात स्वतःपासून करावी आणि त्या झाडाची निगा राखावी, असे आवाहन पर्यावरणमंत्र्यांनी केले.































































