
केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांवर दिली जाणारी सबसिडी 2028 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पीएम ई-ड्राईव्ह स्कीमला 31 मार्च 2028 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्र सरकारने 1 ऑक्टोबर 2024 पासून पीएम ई-ड्राईव्ह योजना सुरू केली होती. 10 हजार 900 कोटी रुपयांची योजना मार्च 2026 ला संपणार होती, परंतु त्याआधीच या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली असून वाहन खरेदी करताना ग्राहकांना याची सबसिडी मिळते.