
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
मंगळवारचा दिवस पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप घेऊन आला. तृणमूल काँग्रेसचे तीन आमदार आणि जवळपास 60 नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीमध्ये नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात टीएमसीच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर ‘ये तो सिर्फ झांकी है’, म्हणत कैलाश विजयवर्गीय यांनी बंगालमध्ये येत्या काळात तृणमूलला आणखी धक्के सहन करावे लागणार असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
तीन आमदार आणि 50 ते 60 नगरसेवकांनी पक्षप्रवेश केल्यानंतर कैलाश विजयवर्गीय यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, ‘पश्चिम बंगालमध्ये जशा सात टप्प्यामध्ये निवडणुकील पार पडल्या, तसेच सात टप्प्यामध्ये भाजपमध्ये प्रवेश होतील. आताचा हा फक्त पहिला टप्पा आहे. भविष्यामध्येही भाजपमध्ये पक्षप्रवेश सुरूच राहतील.’
Kailash Vijayvargiya, BJP National General Secretary on 3 MLAs and more than 50 Councillors from WB joining BJP: Like the elections were held in seven phases in West Bengal, joinings in BJP will also happen in seven phases. Today was just the first phase. pic.twitter.com/YbYEYK2KwU
— ANI (@ANI) May 28, 2019
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने पश्चिम बंगालमध्ये मोठे यश मिळवले. भाजपने पहिल्यांदाच येथे 18 खासदार निवडून आणले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरही बंगालमध्ये भाजपची घोडदौड सुरूच आहे. मंगळवारी नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमामध्ये तीन आमदार आणि राज्यातील विविध भागातील जवळपास 50 ते 60 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यातील सर्वाधिक 24 नगरसेवक हे कंचरापारा, हलिशहर आणि नैहाती महानगरपालिकेचे आहेत.
TMC MLAs Subhranshu Roy, Tusharkanti Bhattacharjee and CPM MLA Devendra Roy joined BJP today in Delhi. Subhranshu is the son of BJP leader Mukul Roy and had been suspended by TMC recently. https://t.co/ajgprN4Ept
— ANI (@ANI) May 28, 2019


























































