
सुदान देशात लष्कराने बंड पुकारले असून पंतप्रधान अब्दुल्ला हामडोक यांना त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवले आहे. तसेच इतर पॅबिनेट मंत्री व पाच वरिष्ठ सरकारी अधिकाऱयांना अटक केली आहे. याच वेळी सत्तापालटचा दावा करून लष्कराने देशात आणीबाणीही जाहीर केली आहे. दुसरीकडे हजारो लोकांनी प्रमुख रस्त्यांवर तीव्र निदर्शने करून जागोजागी टायरची जाळपोळ केली. त्यामुळे देशभर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सुदानी लष्कराने सोमवारी सकाळीच एकीकडे पंतप्रधान हामडोक यांना नजरपैदेत ठेवले, त्यांच्या घराभोवती सैनिकांनी वेढा घातला. त्याच वेळी दुसरीकडे चार पॅबिनेट मंत्र्यांसह सत्ताधारी सार्वभौम परिषदेच्या सदस्याला अटक केली. त्याआधी रविवारी लष्करसमर्थक हजारो निदर्शकांनी राजधानी खार्टूम आणि ओमडुरमॅनच्या प्रमुख रस्त्यांवर तीव्र निदर्शने केली. त्यांनी काही काळ रस्ते आणि पूल रोखून धरले. तसेच जागोजागी टायर पेटवून दिले. यामुळे मध्यवर्ती भागाचा उत्तरेकडील भागाशी संपर्क तुटला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांनी संतप्त निदर्शकांवर अश्रुधुराच्या गोळ्या झाडल्या. देशात कट्टर इस्लामवादी आणि लोकशाही समर्थक या दोन गटांमध्ये संघर्ष सुरू आहे. देशभरातील इंटरनेट आणि दूरध्वनी सेवा खंडित करण्यात आली आहे.
भीषण गृहयुद्ध भडकण्याची शक्यता
दोन वर्षांपूर्वी हुकूमशहा उमर अल-बशीर यांना लष्कराने सत्तेतून हटवले होते. त्यांना पैदेतही ठेवण्यात आले होते. त्यावर पलटवार करीत त्यांच्या समर्थकांनी आता देशात सत्तापालट केला आहे. लष्कराने आणीबाणीची घोषणा करीत सरकारचे सर्व अधिकार संपुष्टात आणले आहेत. त्यामुळे भीषण गृहयुद्ध भडकण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर सुदानमधील कट्टरपंथी गट सक्रीय झाला आहे.
अमेरिकेने व्यक्त केली चिंता
सुदानी लष्कराच्या पवित्र्यावर अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’मध्ये अमेरिकेचे विशेष दूत जेफरी फेल्टमॅन यांनी सांगितले की, सुदानमध्ये लष्कराने कब्जा केल्याच्या बातम्यांमुळे अमेरिका ‘अत्यंत चिंतीत’ आहे. याचा सुदानला अमेरिकेकडून मिळत असलेल्या मदतीवर परिणाम होईल, असे ते म्हणाले. तसेच अरब लीग आणि युरोपीय संघानेही सुदानमधील घडामोडींवर चिंता व्यक्त केली आहे.




























































