सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले व बिग बी यांची भेट, सुवर्ण काळाला दिला उजाळा

सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांचा स्वप्नपूर्ती करणारा उपक्रम ‘ग्रॅव्हिटी स्टुडिओज्’ नुकताच लॉन्च करण्यात आला. याप्रसंगी त्यांच्यांवर चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडून आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आता यामध्ये अजून एक नाव जोडले गेलेले आहे ते म्हणजे महानायक अमिताभ बच्चन यांचे. नुकतीच सुदेश भोसले व अमिताभ बच्चन यांची भेट जुहू येथील जनक येथे झाली.

या भेटीबद्दलचा आनंद व्यक्त करत सुदेश जी म्हणाले की, ‘अमिताभजी यांची भेट हा माझ्यासाठी मोठा सुखाचा प्रसंग होता. आम्ही नेहमीच कार्यक्रमांद्वारे भेटत असतो, परंतु बर्‍याच दिवसांनंतर मला त्यांच्याशी निवांत बोलण्याची संधी मिळाली. सुपरस्टार असूनही ते माझ्या आणि माझ्या कार्यक्रमांबद्दल विचारपूस करण्यास विसरले नाही. विशेष म्हणजे, गेल्या 6 वर्षांपासून माझ्या वाढदिवशी न चुकता मला शुभेच्छा देणारे अमिताभजी आहेत. मी माझी काही स्केचेस त्यांना दाखविली, आम्ही आयुष्याबद्दल आणि जुन्या आठवणींबद्दल गप्पा मारल्या आणि हे असे क्षण आहेत जे मी आयुष्याभर जपेन. मी, अमिताभजी यांना माझ्या सुधारित स्टुडिओला भेट देण्याची आणि आमच्या संगीताच्या उपक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी येण्याची विनंती केलेली आहे, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या