
स्थानिक पूर्ती साखर कारखान्यातील मानस ऍग्रो युनिट एकमध्ये बायोगॅस उत्पादन टँकच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाल्याने पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाल़ा. ही हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी बेला पोलीस स्टेशन हद्दीत घडली.
सचिन वाघमारे (27), मंगेश नोकरकर (23), वासुदेव लडी (34), प्रफुल्ल मून (25), लीलाधर शेंडे, (सर्व ऱा वडगाव बेला) अशी मृत कामगारांची नावे आहेत. काही कामगार मानस ऍग्रो युनिट क्रमांकमधील 60 लाख लीटर क्षमता असलेल्या बायोगॅस उत्पादन टँक च्या दुरुस्तीचे काम करीत होते. दरम्यान, वेल्डिंग सुरू असताना टँकमधील बायोगॅस लिकेज असल्याने वेल्डिंगच्या ठिणगी लिकेज गॅसच्या संपर्कात आल़ी त्यानंतर टँकमध्ये जोराचा स्फोट झाला. व्यवस्थापनाने सर्व कामगारांना सुट्टी देऊन पाचही मृतदेह बेवारस अवस्थेत सोडून घटनास्थळावरून पळ काढला.

























































