
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
रत्नागिरी तालुक्यातील भाट्ये समुद्रकिनारी एका तरूणाने स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली. त्याचा भाट्ये समुद्रकिनारी अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला आहे.
तुषार बाळकृष्ण चौधरी वय २५ रा.माळनाका याने ज्वलंत पदार्थाच्या सहाय्याने स्वत:ला पेटवून घेतले. आज सकाळी तुषार चौधरी हा आपल्या आईला ऑफिसला सोडण्यासाठी सात वाजता दुचाकी घेऊन गेला. आईला ऑफिसला सोडल्यानंतर तो थेट भाट्येत गेला. त्याठिकाणी त्याने ज्वालाग्राही पदार्थाने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली. अर्धवट जळालेल्या अवस्थेत भाट्ये समुद्र किनारी असलेल्या डोंगराच्या कपारीत तो सापडला. पोलिसांना ही घटना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले त्याला जिल्हा शासकीय रूग्णालयात आणण्यात आले. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

























































