सुजय विखे पाटील आणि लंकेंची नाव न घेता एकमेकांवर टीका, महायुतीत सुरू झालं भांडण

sujay-vikhe-patil-nilesh-lanke

‘राजकारणात सध्या काही पुढारी नको ते अर्विभाव करतात. समाजाची दिशाभूल करून साधेपणाचा आव आणतात. राहायला पत्र्याचे घर दाखवतात मात्र, आलिशान फॉर्च्युनर वाहनात फिरतात, अशी जहरी टिका खासदार सुजय विखे यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यावर नाव न घेता केली. दुसरीकडे आमदार निलेश लंके यांनी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये काही जण स्वतःच्या संस्थेतील यंत्रणा राबवून त्यांचे पैसे कापून यंत्रणा राबवतात असा प्रकार जिल्हा सुरू असल्याची टीका त्यांनी विखे यांची नाव न घेता केली. दरम्यान महायुतीमध्ये आता नगर जिल्ह्यामध्ये भाजपा विरुद्ध अजितदादा पवार गटाचा वाद हा अधिक टोकाला गेला आहे.

लंके यांच्या साधेपणाचा खासदार सुजय विखे यांनी नामोल्लेख टाळत चांगलाच समाचार घेतला. भारतीय जनता पक्षाचे ‘गाव चलो अभियान सध्या सुरु आहे. भाजपच्या अभियानांतर्गत खा, विखे यांनी वाळकी (ता.नगर) येथीलशेतकरी, तरुण वर्ग, महिला बचत गट, सर्वसामान्य नागरिक त्याचबरोबर भाजप पदाधिकारी अन्‌ कार्यकर्त्यांशी रविवारी (दि.११) सुसंवाद साधला. धार्मिक स्थळांनीही त्यांनी भेटी दिल्या. या दरम्यान, विखेंनी लंके यांच्यावर त्यांचे नाव न घेता अनेक मुद्यांवर निशाणा साधला.

विखे यांनी वाळकीच्या एन. डी. कासार कॉलेज ऑफ फार्मसीला सदिच्छा भेट दिली.
त्यावेळी त्यांचे फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करण्यात आले. भेटीदरम्यान, विखे यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला.

शाळेच्या मुलीप्रमाणे मुलांनाही एसटी बसमध्ये मोफत प्रवास द्या, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकर्‍यांना कर्जमाफी द्या, उज्ज्वला गॅस योजना बंद का केली? देश तसेच राज्यस्तरावरील विकासाचा उहापोह करत विखेंनी राजकारणातील ढोंगी साधेपणाच्या प्रवृत्तीवर चौफेर टिका केली. ते म्हणाले की, राजकारणातील काही जण साधेपणाचा आव आणतात. मी सर्वसामान्य आहे, मी साधा आहे, असे भासविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तेच सर्वकाही करतात. वाळूमाफियांचा उद्योग त्यांच्याकडूनच केला जात आहे. अधिकाऱ्यांना वेठीस तेच धरतात. चुकीची कामे तेच करतात. विकासाच्या प्रत्येक कामात टक्केवारी घेतली जाते’, असे ते म्हणाले.

राहायला पत्र्याचे घर असल्याचे सांगतात, मात्र फॉर्च्युनर या आलिशान वाहनात फिरतात, हे कसले त्यांचे साघेपण? असा खडा सवाल विखे यांनी लंके यांचे नाव न घेता केला. विखेंच्या वक्तव्याला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला.

मी इतरांसारखा साधेपणाचा आव कधीही आणला नाही व आणणारही नाही. होणाऱ्या कामास होच म्हणतो, अन् न होणाऱ्या कामास नाहीच म्हणतो, ही माझी पद्धत आहे. मात्र, इतरांची पद्धत्त याउलट आहे. ते न होणाऱ्या कामास हो महणून समाजाची दिशाभूल करतात, असे त्यांनी सांगितलं.

लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास किमान 22 दिवस शिल्लक आहेत. या दिवसात साकळाई योजनेची प्रशासकिय मान्यता घेण्यासाठी शासन दरबारी प्रचंड पाठपुरावा करु. कुठल्याही परिस्थितीत साकळाई योजना पूर्ण करुच. योजना मार्गी लागल्यास ‘ते’ राजकीय संन्यास घेणार का? असे प्रतिआव्हान विखे यांनी लंके यांना नाव न घेता दिले.

आमदार लंकेची विखेंवर टीका

मी अत्यंत साधा माणूस आहे जनता हेच माझे दैवत आहे असे म्हणत मी जनतेसाठी सातत्याने अहोरात्र काम करतो असं म्हणत मुंबईकरांनी मला चांगली साथ दिलेली आहे असे म्हणत त्यांनी जनतेचे कौतुक केले याच वेळेला भाषणामध्ये त्यांनी विखे यांचे नाव न घेता काहीजण आमची यंत्रणा असे म्हणून कामाला लागले आहेत यांची कसली यंत्रणा त्यांच्या संस्थेमध्ये जे पगाराने काम करतात त्यांचीच पैसे कापून त्यांना ते पुरवठा मग कसली यंत्रणा असं म्हणत माझ्याकडे जे आहे ते साधी व स्वच्छ कार्यकर्ते आहेत व त्यांच्या जीवावर मी राजकारण व समाजकारण करत आहे असे म्हणत त्यांनी खासदार विखे यांच्यावर निशाणा साधला.